Monday 4 October 2021

वनस्पती - जीवाणु सहजीवन.


वनस्पती - जीवाणु सहजीवन.
वनस्पती - जीवाणु सहजीवन.

वनस्पती - जीवाणु सहजीवन.
वनस्पती - जीवाणु सहजीवन.
आपले संपुर्ण विश्व जीवाणूंनी व्यापुन टाकले आहे. पृथ्वी, हवा, जमीन, पाणी, ग्रह सर्व विश्व जीवाणूंनी व्यापलेले. यांचे निरंतर प्रक्रीयेमुळे सर्व प्रक्रिया बिनबोभाट चालु असतात. अगदी मणुष्य प्राणी ते सर्व सजीव यांचेतील आरोग्य सुद्धा या जीवाणूंमुळे अविरत चालु असते. फारच थोडे जीवाणू असे असतात की ते त्रासदायक असतात. 

जिथे कुठे वातावरणात बदल घडतो तिथे संख्येने थोडे असणारे जीवाणू उपद्रवकारक ठरतात. असो.

मी माझ्या टेरेस वर खरीपा मध्ये भेंडीचे चांगले पिक घेतले. एक भेंडी 30 ग्रॅम, एकुण 15 तोडे, प्रतीझाड 450 ग्रॅम एका सिझनला. 8 फुट × 4 फुट वाफयात 92 झाडे. म्हणजेच साधारणतः 40 ते 42 किलो भेंडी उत्पादन कीडनाशकाची फक्त दोन फवारणी, व बेसल डोस खतावर मिळाले. म्हणजे 12 ते 15 टन प्रति हेक्टर. सर्वच्या सर्व पुर्णतः जोमदार व निरोगी झाडे.

दोन दिवसापूर्वी सर्व झाडी उपटली व काही निरोगी झाडांच्या मुळावर मोठमोठ्या गाठी दिसुन आल्या. साहजिकच कृषी क्षेत्रात काम केल्यामुळे उत्सुकता होती. शेवटी कशामुळे याचा अचूक निदान काही झाले नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील माझे काही सहकारी यांना फोटो शेअर केले. तेंव्हा कोणी सुत्रकृमीचा प्रादुर्भाव असावा, तर कोणी उपयुक्त जीवाणू की जसे अॅग्रोबॅकटेरीअम मुळे असु शकते. असो.

मला वाटते चांगले जीवाणूंची संख्या व प्रकार संवर्धन झाले असल्याने भेंडीची झाडी जोरदार व निरोगी होती. त्यामुळे मी खात्रीने सांगू शकतो की उपयुक्त जीवाणू असले पाहिजे. असो. जर शेतजमीनीचा पोत चांगला राहिला तर उपयुक्त जीवाणूंची संख्या व प्रकार नक्कीच संवर्धन होईल. जमीनीचा पोत चांगला रहाण्यासाठी तेथील पिकाचा प्रत्येक अवशेष तिथेच कुजवला गेला पाहिजे. शिवाय जमीनीत भरपूर प्रमाणात मलमुत्र मिसळले गेले तर खते,  औषधांचा वापर किमान 80 % कमी होईल. 

सारांश जमीनीचा पोत सुधारला पाहिजे.